Section A
Q1. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादकपूर्वक विवेचन करा: 10× 5 = 50 या उपरि मागौतें कामाइसीं म्हणितलें: ‘भटो रावो मरैल: आणि मातें आगीआंतु घालीतील:’ भटोबार्सी म्हणितलें:
(a) 'तरि तुम्ही आपुला आदि भावो चुकवा.’ ‘मग ते बळाधिकारें घालीतीलः’ ‘तरि तुम्हां आत्महत्येचें नरक नाहींः’ इतुलेनि ते उगीचि राहिलीः मग कांहीं पदार्थ आणिला होताः तो भटोबासांसि संपादिलाः मग आज्ञा घेउनि गावां गेलींः॥ मग कितीका दिसां रावो निवर्तलाः मग तेहीं तैसेंचि केलेंः बहुतापरि उवापुला आदिभावो चुकवीला. "तर मग बरोबर! आम्ही तरी त्यांना संतच समजत होतो."
(b) विश्वासनं चपापून त्याच्याकडं पाहिलं. चर्या तर सद्भावयुक्त दिसत होती! ‘‘कोणाला?’’ संदर्भ विसरून विश्वासनं विचारलं. ''तुमच्या वडिलांना हो! मौज अशी की, तेसुद्धा दुःखातच मेले!'' सदाशिवरावांनी किंचित हसून उत्तर दिलं. ‘‘त्यात मौज कोणती दिसली तुम्हांला?’’ कासावीस होत विश्वासनं विचारलं. पुढं शेवंतीकडून बोलवत नसे. खांद्यावर डोळे कोरडवण्याखेरीज ती काहीच करत नसे. हे बघून कवेतल्या अनंताला
(c) काय वाटे, तोच जाणे! मायकडे पाहता पाहता एक दिलखुलास उसळी मारून तो हसू लागे. शेवंती त्याच्याशी बोले, ‘‘काऽय हासतं बेलमा! माया जिवाची काई फिकर आये तुले? उद्या मेली मंजे दिसते ना देव! थांब जरा; मंग हासजो-काय हासतं तं! जातं कुठीसा?" हेच पण थोड्याफार फरकानं आजही झालं. नाल मारण्यासाठी फास टाकून बैल जसा उलथा करतात, तसा दामूच्या उद्गारानं गाव उलथा झाला. करीमचाचातील
(d) प्रामाणिक माणूस कंठ फोडून ओरडला— ‘‘ए कभी होगा नहीं, मैं ऐसा सत्यानास होनेकू दुंगा नहीं.’’ त्यासाठी दामूला दुणता करण्यासाठी जगन्नाथ वेताळ होऊन उठला. त्याच्या डोळ्यात वीज चमकून गेली, त्याची भुवई सळसळून दुभंग झाली, दात करकरले, खालच्या ओठाने अंग ताणले, हंटर गरगरत कडे ओलांडून दामूकडे येऊ लागला-लक्ष्या पुजारी रागानं मारुतीचे पाय ओरबाडू लागला. जसजसा मोठा होत चाललो तसतसा शाळा नसली म्हणजे लोकायसंग गुड खुडायला व नंतर नंतर पिवळा कापायला
(e) जायला लागलो. गुड खुडणे एकदाचे सोपे पण पिवळा कापणे जरा कठीण. कारण जरा धाट धांडाळ फिडाळ असलं तर कधी कधी धाट न कापून विळा हातावर किंवा पायावर येयाचा. विळ्याने व धांडाळ धाटाच्या चिवटीने हाता पायाचे बोटं अनेक वेळा कापून रक्त नसतानाही बाहेर आल्यामुळे खूप आग झाल्याचे व चिघळू नये म्हणून जखमजोडीचा पाला लावल्याचे आठवते. 2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा : ‘महात्मा फुले यांनी ब्राह्मण्य मानसिकतेच्या वर्णवर्चस्वाविरुद्ध जो ऐतिहासिक संघर्ष केला’ त्याची ‘सार्वजनिक
(a) सामधर्म’ या ग्रंथाच्या माध्यमातून ओळख करुन द्या. 15 ‘ब्राह्मणकन्या’ या कादंबरीच्या कथानक रचनेचे वैशिष्ट्ये सोदाहरण नोंदवा.
(b) प्र० के० अत्रे यांच्या ‘साष्टांग नमस्कार’ मधून दिसणाऱ्या विनोदी शैलीचे वेगळेपण नोंदवा.
(c) 3. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा : 'स्रीला सातत्याने दुय्यम स्थानी ठेवण्यामागे प्रस्थापित पुरुषप्रधान व्यवस्थेची मनोभूमिका कारणीभूत आहे' या
(a) विधानाची ‘एकेक पान गळावया’ या गौरी देशपांडे लिखित कादंबरीच्या आधारे चिकित्सा करा. SDF-B-MRTH/28 2