Section A
Q1. पुढील पाच उत्ताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा : 10× 5 = 50 याउपरि मागौतें कामाइसीं म्हणितलेंः ‘भटो रावो मरैलः आणि मातें आगीआंतु घालीतीलः’ भटोबासीं म्हणितलेंः ‘तरि
(a) तुम्ही आपुला आदिभावो चुकवाः’ ‘मग ते बळाधिकारें घालीतीलः’ ‘तरि तुम्हा आत्महत्त्येचे नरक नाहीः’ इतुलेनि ते उर्गीचि राहिलीः मग काही पदार्थ आणिला होताः तो भटोबासांसि संपादिलाः मग आज्ञा घेउनि गावां गेलीः॥ मग कितीका दिसां रावो निवर्तलाः मग तेही लैसेचि केंलेंः बहुतापरि आपुला आदिभावो चुकवीलाः परी येरी बळाधि- कारूचि केलाः आता आमच्या नीर्तिमान धार्मिक सरकारने केवळ धर्मलोभ एकीकडे ठेऊन शेतकऱ्यांचे आचरणावर डोळा
(b) ठेवण्याकरिता डिटेक्टिव्ह डॉक्टरांच्या नेमणूका करून शेतकऱ्यांनी आपल्या गैरशिस्त आचरणावरूनी प्रकृति बिघडविल्यास व चोऱ्या छिनाल्या वगैरे नीच आचरण केल्यास त्यांस योग्य शिक्षा करण्याविषयी चांगला बंदोबस्त केल्याविना ते नीतिवान होणे नाहीत. ज्यांना कुठल्याही तऱ्हेची जवळीकच नको वाटते असेही काही असतीलच की जगात. आणिक जवळीक
(c) झाल्याखेरीज त्यांना कसं उमजणार की हे नको मला म्हणून? मनात आलं. एक क्रांती व्हायला हवी—सगळ्या या समाजमान्य पद्धती बदलणारी. ध्येय असलेली मंडळी अनेक शतकांनी होणारी गोष्ट करण्यास हात घालतात. त्यांच्या आयुष्यात तर काहीच होत
(d) नाही, आणि त्यांच्या बायकांमुलांना मात्र त्यांचे ध्येयवादित्त्वाचे फल भोगावे लागते. अरे तुम्ही सारे सरकारचे जावई! उगीच गपचीप जे दिले ते खाण्यापेक्षा किरकिर का करायचं? तुम्हाला सरकारनं सारं
(e) दिलंय आता फक्त पोरी देयाच्या राहिल्यात. 2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा : नागदेवाचार्यांच्या ठिकाणी असणाऱ्या बुद्धी व भावना यांचे मनोज्ञ मिश्रण आणि त्यांच्या बुद्धिमत्तेची अनुभूती
(a) कशाप्रकारे येते? ‘स्मृतिस्थळ’ मधील विविध प्रसंगांच्या आधारे विशद करा. 15 ‘सार्वजनिक सत्यधर्म’ या पुस्तकाच्या लेखनामागील महात्मा जोतीराव फुले यांची विचारधारा स्पष्ट करा.
(b) सामाजिक भूमिकेतून कौटुंबिक भावनांचे विश्लेषण श्री. व्यं. केतकरांनी कशारीतीने केले आहे? ‘ब्राह्मणकन्या’ या
(c) कादंबरीतील घटना-प्रसंगांच्याद्वारे उलगडून दाखवा. 20 3. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा : ‘साष्टांग नमस्कार’ या नाटकातील विनोदांचे विशेष उदाहरणे देऊन विशद करा.
(a) ‘जेव्हा मी जात चोरली होती’ या कथासंग्रहातील कथांमधून उद्याच्या सुंदर, निरामय आणि सशक्त जगाचे स्वप्न
(b) बाबुराव बागूल यांनी मांडलेले आहे; असे तुम्हास वाटते का? साधक-बाधक चर्चा करा. 15 उद्धव शेळके यांच्या कथालेखनात अस्सल मानवतावादी जीवनदृष्टीची अनुभूती कशी येते, ‘शिळान’ या
(c) कथासंग्रहाच्या आधारे स्पष्ट करा. SKYC-B-MRTH/30 2