Section A
Q1. खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर 600 शब्दांत निबंध लिहा : 100 भारतातील स्वास्थ्य स्थिती
(a) भारतातील शेतकरी कायद्याचे महत्त्व, 2020
(b) राष्ट्रीय शैक्षणिक धारणासमोरील आव्हाने, 2020
(c) कृत्रिम बुद्धिमत्तेचा वर्तमानातील उपयोग
(d) 2. पुढील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि उताऱ्याच्या शेवटी दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सुस्पष्ट, योग्य व संक्षिप्त भाषेत लिहा : 12×5 = 60 जीवन आणि पर्यावरणाचा एकमेकांशी खोलवर संबंध आहे. निसर्गाच्या अधिपत्याखाली माणसाची वैविध्यपूर्ण जीवनशैली असल्यामुळे, आपले मन, शरीर रचना आणि शक्तिसामर्थ्याचे विशेष गुणधर्म पर्यावरणामुळे संपूर्णपणे विकसित आणि संवर्धित होत असते. खरेतर, जीवन आणि पर्यावरणाचा अनुबंध हा एकमेकांवर आधारित, संलग्न व अत्यावश्यक आहे. पर्यावरण हे आपले सुरक्षाकवच असून नैसर्गिक शक्तिकडून मानवी जीवनाच्या संवर्धनासाठी मिळालेली ती भेट आहे. पर्यावरण निसर्गाने दिलेली देणगी आहे. ही भूमी, जंगल-डोंगर, नदी-नाले, रंगी बिरंगी पशुपक्षी, हिरवी रानमाळं, वाळवंट आणि झुळझुळणाऱ्या झऱ्यांनी संपन्न अशी आहे. या धरितीवरील वाहणारे मंद, सुगंध शीतल वारे तसेच पावसाच्या पाण्याने अमृतवर्षाव करणारे ढग हे सर्व या पृथ्वीवरील मानव प्राण्यासाठी सुख-समृद्धी आणि समतोल पर्यावरणाची निर्मिती करतात. परंतु निसर्गाचा समतोल वेगाने ढासळत असल्याचे दिसत आहे. आणि आश्चर्यकारक बाब म्हणजे मानवाला मिळालेली ही नैसर्गिक देणगी त्याच्या बेफाम सदोष वागण्याच्या अस्ताव्यस्ततेमुळे, आंधळेपणामुळे मानवालाच हानिकारक ठरते आहे. संपूर्ण पर्यावरणाची संरचना अविवेकी मानवी वर्तनाने बिघडत आहे, त्यामूळे आता ते दिवस दूर नाहीत की, हजारो वर्षापूर्वी ज्याप्रमाणे हिमनग, बर्फाळ पर्वत आणि प्रलयंकारी समूदाच्या लाटा, वन-पर्वत, शहरं तसेच जीवजंतुंच्या ऱ्हासाची अवस्था दृश्यमान होऊ शकेल. निश्चितपणाने निसर्गाचे विकारी व दोषपूर्ण गढूळलेले स्वरूप समाजातील विषारी घटकांमूळे निर्माण होत आहे. आपण निसर्गाचे संतुलन बिघडवत आहोत. या असंतुलनामुळे जमीन, वायु, पाणी आणि ध्वनीचे प्रदुषण निर्माण होत आहे. नैसर्गिक प्रदुषणांमूळे फुप्फुसाचे रोग, हृदयरोग, पोटाचे विकार, दृष्टि आणि श्रवण कमजोरी, मानसिक तणाव आणि इतर तणाव संबंधित रोग निर्माण होत आहेत. आपण सर्वजण जाणतो की नैसर्गिक संतुलनामुळेच मानवी जीवनाचे अस्तित्त्व URC-C-MRTH/33 2