Section A
Q1. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादकपूर्वक विवेचन करा : 10 × 5 = 50 ...सरकारी गोरे अधिकारी हे बहुतेक करुन ऐषआरामात गुंग असल्यामुळें त्यांना शेतकऱ्यांचे वास्तविक स्थितीबद्दल
(a) माहिती करून घेण्यापुरती सवड होत नाही व या त्यांच्या गाफीलपणाने एकंदर सर्व सरकारी खात्यांत ब्राम्हण कामगारांचे प्राबल्य असतें, या दोन्ही कारणांमुळे शेतकरी लोक इतके ऌुटले जातात की, त्यांस पोटभर भाकर व अंगभर वस्त्रही मिळत नाही... एक वेळ भटोबासांसी तृषा लागली : तें एकाते म्हणतिलें : मज पाणी पाजा गा : तंबं तेहीं बिल्लरीचे उदक गाळुनी
(b) आणीलें : आणि भटोबासांसी संपादीले : ते भट पीयाले : भग म्हणांतलें : भटो तुम्हां बोडिगंगा समान सांधितीली अर्से कीं : भटोबासी म्हणीतलें : ते आपणयांसी समान होआवी : पुढीलासी संपादीतां बोडि ले बोडि : आणि गंगा ते गंगा : ऐसी बुधि हुआवी की : तथा भावेहीन तें दैवंहीन म्हणणें. स्त्रीने विवाहपद्धतीचा व पुरुषांकिततेचा स्वीकार करून आपल्या पोषणाची आणि आपल्या अपत्यांच्या पोषणाची
(c) जबाबदारी पुरुषावर डकलावी ही गोष्ट बहुजनसाध्य असल्यामुळे या रीतीचाच अवलंब जगभर झाला. आणि ही संस्था यशस्वी करण्यासाठी पातिव्रत्याचे महत्त्व सर्व कवी वर्णू लागले व पुरुषाचा अधिकार पक्का होण्यासाठी कायदे होऊ लागले. मी बी.ए. परीक्षेत पांच वेळा नापास झालो! का झालो याचे कारण ठाऊक आहे? आमचे स्टार्सच असे भिकार की,
(d) प्रत्येकवेळी परीक्षेत नेमका असा नंबर यायचा की, त्याच्या आकड्यांची बेरीज हटकून नऊ व्हायची. पहिल्या परीक्षेस सुरुवात नऊ तारखेला होती, तर शेबटल्या खेपेला परीक्षेचा निकाला नऊ तार खेला होता. आम्ही दोघेही तसच त्या भाकरी व जी असेल ती भाजी खातासू, येवढं मात्र खरं की धर्माला चोरून त्याला चांगली
(e) भाकर ठेवून कचकच लगणारी मी खाऊन टाकायचो कारण मला वाटायचं की धर्मा हा गुरुमायीचा पोरगा व आपण एक परदिसा व ह्या धर्माच्या नावानं येवढं तरी मिळतं तेही काही न करता मग किती चांगल है हे सगळं वाटायचं. 2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा : तत्कालीन राजकीय, सामाजिक आणि धार्मिक परिस्थितीचे चित्र 'स्मृतिस्यळा'तून कसे साकार झाले आहे,
(a) त्यासंदर्भातील मत साधार स्पष्ट करा. 15 महात्मा फुले यांनी 'शेतकन्याचा असूड' मध्ये त्या काळातल्या शेतकन्यांच्या अवनत स्थितीचे वर्णन केले आहे. या
(b) विधानाचा परामर्श ध्या. 15 'आठवर्णीचे पक्षी' मधील जीवनानुभव सामान्यपासून तत्त्वशोधन करणाऱ्यांपर्यंत सर्वांना अन्तर्मुख करणारे आहेत, हा
(c) देखलि ह्या छोट्या ग्रंथातील एक महत्त्वचा विशेष होय, या विधानाची साधार चर्चा करा. 20 3. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा : 'एकेक पान गळावया' या कादंबरीची मध्यवर्ती कल्पना स्त्री-पुरुष नातेसंबंधांभोवतीच फिरते. साधार स्पष्ट करा.
(a) शरचंद्र मुक्तिबोध यांनी 'बिशू' च्या माध्यमा द्वारे सामर्थ्यशाली प्रवृत्ती असलेल्या एका व्यक्तिमत्त्वाऱ्या विकासाचा
(b) आलेख रेखाटला आहे, या विधानाच्या संदर्भात साधार उहापोह करा. 15 बाबूराव बागूल हे दलित जीवनाचे प्रभावी भाष्यकार होते, या विधानाची 'जेव्हा मी जात चोरली होती' या
(c) संग्रहाच्या आधारे चिकित्सा करा. EGG-D-MRGER122 2