Section A
Q1. पुढील पाच उत्ताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: 10× 5 = 50 एक वेळ एके ब्राह्मणे भटोबासाते पूसीले: "हा भटो तुमचि मुर्ति झळझळीत दिसत असेः तरि तुम्ही काइ त्रीकाळ
(a) स्नान करीता?" तंबं भटोबासी म्हणीतलें: "पंचवीस वरूषे भिक्षेसी जाली: परि तै लागौनि उष्णवणी आन सीतलवणी: आंगी लावीली नाही." तंवं तेणे म्हणीतलें: "तरि हें कैसे भटो?" भटोबासी म्हणीतलें: "गगनी तारांगणें झळझळीत दिसति: ते काइ तयांचें मंदिर झळकताए: किं आतौल आहे तें झळकताए?'' भटोबासी म्हणीतलें: ''तैसे माझीया राजमंदिरामध्ये वस्तु आहे: ते क्रीडताए: म्हणौनि माझी मुर्ति झळझळिताए:"॥ विश्वासला चार महिने सक्त मजुरीची शिक्षा झाली. त्यानं ती मुकाट्यानं ऐकली शिक्षेच्या अवधीत त्यानं इकडंतिकडं
(b) पाहिलं नाही. स्वतःसाठी कोणतीच सवलत मागितली नाही. शारीरिक कष्ट जणू तो स्वेच्छेनं करीत होता. त्यानं कसलीच कसूर केली नाही. भोवताली बघणं आणि विचार करणं एवढंच काम जणू तो करीत होता. त्यामुळं त्याची प्रकृती बरीच सुदृढ झाली. तो बाहेर आला तेव्हा शांत डोळ्यांनी बाहेरच्या जगाकडं बघू लागला. आपल्या घराशी आला तेव्हा त्याला जाणवलं की अरे! आपण आपल्या घरासमोर उभे आहोत! काम मातीचे व माती कामांची कारण शेवटी माणूसही मातीच व मातीच माणूस व माणसापेक्षा श्रेष्ठ. कारण मातीच
(c) जगवतेना साऱ्या प्राण्यांना, माणसांना. आपले सारे कष्ट उपसून व स्वतः झिजून म्हणूनच ती काळी माती व तिच्या धनावर पोसले जाणारे आम्ही सारे तिचेच धन आरंभापासून ते शेवटपर्यन्त. बाटे तुज मृगया। ही का?
(d) समजसि जग जणुं। जंगल सारें, आणिक स्त्रीजन। वन्य पशु कां? बघुनि मृगातें। कस्तुरी मिळते, लाभे तैशी। प्रीति कधीं का? मुलाचे हे कानाचे पडदे फाडणारे कराल क्रंदन ऐकून म्हातारा रडू लागला. थरथरू लागला. त्याच्याकडे दिनवाण्या
(e) नजरेने पाहू लागला; आणि बापाचे अश्रू आणि त्याच्या अंगाचा चाललेला कंप पाहून जयचंद खाली बसला. त्याची छाती चोळू लागला. डोळे पुसू लागला. आणि त्याच्या स्वच्छ सुकुमार बोटांतील प्रेम पाहून म्हाताऱ्याने त्याचे डोके ओढून आपल्या छातीवर ठेवले. ते तो गोंजारू लागला आणि गेल्या दोन-चार-पाच वर्षांपासून घरात असूनही मानसिक दृष्ट्या एकाकी झालेला जय पितृसुखाचे सुख घेत तसेच डोके ठेवून बसला. उन्हात जळणारे शेत जसे कोसळणारा पाऊस पिऊन सुगंधू लागते, फुलू लागते, तसा तोही स्नेहस्निग्ध होऊन सुगंधू लागला. 2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा : ‘स्मृतिस्थळ’ या ग्रंथात यादवकालीन सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक जीवनसंदर्भ सहजभावाने
(a) साकारलेले दिसतात, साधार लिहा. 15 'शेतकऱ्याचा आसूड’ या ग्रंथात शेतकऱ्यांच्या स्थितिगतीचे जे चित्रण आढळते ते सार्वकालिक ठरणारे आहे, हे
(b) विधान सोदाहरण स्पष्ट करा. 15 ‘ब्राह्मणकन्या’ या कादंबरीतील आशयविषयाची सामाजिकतेच्या अंगाने चिकित्सा करा.
(c) CRNA-S-MRTH/34 \overlinec